ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वसमत तालुक्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 02:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वसमत तालुक्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू

शहर : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये एकाच कुटूंबातील तीन जणांचा भाजून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे कुरुंदा परिसरावर शोककळा पसरली आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे. गुरुवारी रात्री सोनाजी आनंदराव दळवी (55), त्यांची पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (45) व त्यांची मुलगी पूजा सोनाजी दळवी (25) हे घरात झोपले होते.
शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये घरातून आगीचा मोठा भडका उडाला. झोपेत असलेल्या दळवी कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका खूप मोठा असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. तोवर वसमत येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर दळवी कुटुंबातील तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. 

मागे

जयप्रभा स्टुडिओबाबत लता मंगेशकर यांना दिलासा
जयप्रभा स्टुडिओबाबत लता मंगेशकर यांना दिलासा

जयप्रभा स्टुडिओबाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेला दावा न्यायालया....

अधिक वाचा

पुढे  

आर. के. स्टुडिओच्या जागी बांधले जाणार आलिशन बंगले
आर. के. स्टुडिओच्या जागी बांधले जाणार आलिशन बंगले

चेंबूर येथे उभ्या असलेला आर. के. स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने विकत....

Read more