ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट

शहर : मुंबई

येत्या काही दिवसातच 2019 वर्ष संपणार आहे. 2020च्या स्वागताची तयारी देखील सुरु केली असेल आणि काहींनी तर पुढील वर्षात कुठे जायचे याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली असेल. नव्या वर्षात काय करायचे याचे प्लॅनिंग करण्याआधी तुम्हाला सुट्टी कधी मिळणार हे देखील जाणून घेण महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुढील वर्षी तुम्हाला कोणत्या महिन्यात हक्काच्या सुट्ट्या मिळणार आहेत त्याबद्दल...

जानेवारी-: 2020मधील पहिल्या महिन्यात अनेक सुट्ट्या या बुधवारी येतात. नव वर्षातील पहिला दिवस बुधवारी आहे. या महिन्यातील सुट्ट्यांचा विचार केल्यास मकर संक्रात आणि पोंगल 15 जानेवारी (बुधवार) रोजी येतो. यावर्षी 26 जानेवारी रविवारी येतो. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त सुट्टी मिळणार नाही. वसंत पंचमी 29 जानेवारी रोजी पुन्हा बुधवारी येते.

फेब्रुवारी-: या महिन्यात गुरु रविदास जयंती 9 फेब्रुवारी रोजी येत आहे. त्यानंतर 18 तारखेला दयानंद सरस्वती जयंती तर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. 21 तारखेला महाशिवरात्र आहे.

मार्च-: मार्च महिन्यात केवळ दोनच सुट्ट्या आहेत. होळी 10 मार्च रोजी (मंगळवारी) तर गुढी पाडवा 25 मार्च रोजी (बुधवारी ) आहे.

एप्रिल-: नव्या वर्षातील चौथ्या महिन्यातील दुसऱ्याच दिवशी राम नवमी येते. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 6 तारखेला महावीर जयंती आहे. जर तुम्ही सुट्ट्यांचे प्लॅन करत असाल तर 10 ते 13 एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे. 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे. 12 तारखेला इस्टर तर 13 तारखेला बैसाखी आहे. त्यामुळे तुम्ही सलग चार दिवस सुट्ट्यांचे नियोजन करू शकता.

मे-: एक मे (शुक्रवार) रोजी कामगार दिनाची सुट्टी झाल्यानंतर 7 मे (गुरुवार) रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. 25 मे (सोमवार) रोजी ईद-उल-फितर आहे. याचा अर्थ तुम्ही 24 मे (रविवार) आणि 25 अशा दोन दिवस सुट्ट्यांचे नियोजन करू शकता.

जून-: या महिन्यात सुट्ट्यांसाठी फार दिवस नाहीत. 23 जून रोजी जगन्नाथ रथ यात्रा उत्सव आहे.

ऑगस्ट-: पुढील वर्षी ऑगस्ट महिना सुट्ट्यांसाठी खास आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी बकरी ईद आहे. जो शनिवारी येतो. त्यामुळे याला जोडून रविवार आहे. तर 13 तारखेला रक्षाबंधन आहे. त्यामुळेच 1 ते 3 ऑगस्ट असे सुट्ट्यांचे नियोजन होऊ शकते. 12 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे. स्वतंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी शनिवार आहे. 16 तारखेला रविवार असल्याने दोन दिवसाचे प्लॅन तुम्ही करु शकता. अशाच पद्धतीने 22 ऑगस्ट रोजी विनायक चतुर्थी आहे तर दुसऱ्या दिवशी मोहरम आहे. 31 ऑगस्टला ओणम आहे.

ऑक्टोबर-: महिन्याची सुरुवात गांधी जयंतीपासून होते. पण या महिन्यात दसऱ्याची स्वतंत्र सुट्टी मिळणार नाही. दसरा 25 ऑक्टोबर रोजी असून तो दिवस रविवारचा आहे.

नोव्हेंबर-: या महिन्यात दिवाळीचा उत्सव आहे. 14 नोव्हेंबर (शनिवार) रोजी दिवाळी असून 15ला जोडून सुट्टी घेऊ शकता. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी सुट्टी घेऊन तुम्ही 3 दिवसांचे प्लॅन करू शकता कारण 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक देव यांची जयंती आहे.

डिसेंबर-: डिसेंबर महिन्यात ख्रिसमसची सुट्टी शुक्रवारी येते.

मागे

Airtel ने घेतला मोठा निर्णय
Airtel ने घेतला मोठा निर्णय

टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागल....

अधिक वाचा

पुढे  

कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा
कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

'कांद्याचे भाव वाढले आहेत तर ओरड होत आहे. पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार य....

Read more