By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कोल्हापूर,सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
पूरग्रस्तांना सध्या बाटलीबंद पाणी, मेणबत्ती-काडीपेटी, सुके खाद्यपदार्थ आणि कपड्यांची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी या वस्तू पुणे रल्वे स्थानका जवळील विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) मदत कक्षात द्याव्यात. नागरिकांनी मदत म्हणून जुने कपडे देऊ नयेत. द्यायचे असल्यास नवीन कपडेच द्यावेत असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. तर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी देखील १ हजार पाण्याचे बॉक्स पोचविण्यात येणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 चा म....
अधिक वाचा