By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 04:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्याच दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी घोषणा केली. संपूर्ण देशभर राष्ट्री नागरिक नोंदणी उपक्रम (NRC)राबवणार असल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं. NRC ची प्रक्रिया कुठल्याही धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. धार्मिक, वांशिक भेदाभेद यामध्ये नसतील, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
Home Minister Amit Shah in Rajya Sabha: NRC has no such provision which says that no other religion will be taken under NRC. All citizens of India irrespective of religion will figure in the NRC list. The NRC is different from Citizenship Amendment Bill https://t.co/vYMnH9SKQL
— ANI (@ANI) November 20, 2019
NRC वर राज्यसभेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. "धर्माधारित नागरिक नोंदणी करणं या NRC मध्ये अपेक्षित नाही. ज्या वेळी देशभर NRC करण्यात येईल, त्या वेळी पुन्हा एकदा आसाममध्येही ही प्रक्रिया होईल. कुठल्याही धर्माच्या नागरिकांना NRC पासून धोका नाही. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये. सर्व समूहांना NRC अंतर्गत सामावून घेण्याची व्यवस्था आहे," अशी माहिती अमित शहांनी राज्यसभेला दिली.Citizenship Amendment Bill पुन्हा एकदा नव्याने संसदेत मांडलं जाईल. याचा NRC शी संबंध नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
HM Amit Shah: Hindu, Buddhist,Sikh,Jain, Christian, Parsi refugees should get citizenship,that is why Citizenship Amendment Bill is needed so that these refugees who are being discriminated on basis of religion in Pakistan,Bangladesh or Afghanistan, get Indian citizenship pic.twitter.com/5Bu56ZRxOQ
— ANI (@ANI) November 20, 2019
आसाममध्ये काय झालं?
आसाममध्ये सर्वप्रथम NRC ची प्रक्रिया करण्यात आली. इथल्या NRC ची पहिली यादी 31 ऑगस्टला जारी करण्यात आली.या यादीत 19 लाखांहून अधिक जणांची नावं नव्हती. 3 कोटी 30 लाख 27 हजार 661 लोकांनी NRC साठी नोंदणी केली होती. त्यापैकी 19,06,657 लोकांना या यादीत स्थान देण्यात आलं नाही. बाकीचे भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध झालं. या यादीतून एवढ्या मोठ्या संख्येने विशिष्ट धर्माचे लोक वगळण्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरूनच गदारोळ सुरू आहे.
लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर ही बातमी म....
अधिक वाचा