By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. अमित शाह यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा अब्र नुकसानीचा खटला दाखल आहे. याच प्रकरणात न्यायालयाने हे समन्स बजावलंय. तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे (Home minister Amit shah summoned by West Bengal special court).
बिधान नगर येथील विशेष न्यायालयाने संबंधित समन्स काढलं आहे. हे न्यायालय खास खासदार आणि आमदारांविरोधातील प्रकरणांचा निवडा करण्यासाठी तयार करण्यात आलंय. या न्यायालयाने अमित शाह यांना 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोर्टात हजर राहण्यास सांगितलंय. आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटलं आहे, “तुमच्यावरील आरोपांचं उत्तर देण्यासाठी तुम्ही न्यायालयात हजर राहणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः विशेष न्यायाधीशांसमोर 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता हजर राहणं गरजेचं आहे.”
अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. त्यांनी अमित शाह यांच्या 11 ऑगस्ट 2018 रोजीच्या भाषणा विरुद्ध अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. अमित शाह कोलकातामध्ये भाजपने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अनेक आरोप केले होते. याच विरोधात अभिषेक बॅनर्जी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
अब्रनुकसानीच्या दाव्यानुसार, अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात अभिषेक बॅनर्जी यांच्यावर खोटे आरोप केले. शाह यांनी लेचेपेचे, नाट्यमय आणि खोटे संदर्भ देत मुख्यमंत्र्यांचा पुतण्या असं म्हणत आरोप केले.
अब्रुनुकसानीच्या दाव्यात अमित शाह यांच्या कोणत्या विधानांवर आक्षेप?
अमित शाह म्हणाले होते, “ममता बॅनर्जी यांनी नारदा, शारदा, रोज व्हॅली सिंडिकेट भ्रष्टाचार, पुतण्याचा भ्रष्टाचार अशी भ्रष्टाचाराची मालिकाच केलीय. पश्चिम बंगालच्या गावातील नागरिकांना मोदींनी पाठवलेले पैसे मिळाले का? कृपया मोठ्याने सांगा तुम्हाला पैसे मिळाले आहेत का? मोदींनी पाठवलेले पैसे कुठे गेले? 3 लाख 95 हजार कोटी रुपये कुठे गेले? हे पैसे ममता बॅनर्जींनी त्यांचा पुतण्या आणि गोतावळ्याला दिलेत.”
महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीह....
अधिक वाचा