ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 02:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

शहर : मुंबई

तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची आज घोषणा केली. सोनू महाजन यांनी आज कुटुंबासह गृहमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. उन्मेष पाटील यांना भाजप सरकारने वारंवार पाठिशी घातल्याचा आरोप सोनू महाजन यांनी केला आहे.

उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशी करण्याची घोषणा केली आहे. २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

भाजपचे सरकार असल्याने साधा एफआयआर देखील दाखल झाला नाही. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

मागे

मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे
मराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरो....

अधिक वाचा

पुढे  

आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

LAC वर तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांन....

Read more