ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 18, 2020 09:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

शहर : पुणे

पुण्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यासाठी आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पुण्यात कोणतीही लक्षणं नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर घरीच उपचार होणार आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील सर्व खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबबत माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अशा रुग्णांचे समुपदेशन करुन घरीच उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. याबाबत पुण्यातील खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर सूचना दिल्या. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनानं नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 1904 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची आकडेवारी 46 हजार 872 वर पोहचली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 29 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 1243 वर पोहचली. शुक्रवारी दिवसभरात 773 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 हजार 107 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं अनेक रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त होत आहेत. मात्र, वाढणारी रुग्णसंख्या पाहता पालिका झपाट्यानं कामाला लागली आहे. शहरातील विमाननगरमध्ये एसआरए इमारतीत, भारत जैन संघटना, इस्कॉन, आणि बजाज संघटनेच्या मदतीनं पालिकेनं 2800 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. त्यामुळे आता तात्काळ रुग्णाला बेड मिळणार असल्याची माहिती पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. शहरात विविध हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची उभारणी पालिकेच्यावतीनं करण्यात आली आहे.

पुण्यात लॉकडाऊनचा पहिला 5 दिवसांचा टप्पा आज रात्री संपणार आहे. उद्यापासून (19 जुलै) सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे. उद्यापासून नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकानांसाठी वेळ वाढवून मिळणार आहे. पालिका आयुक्त आणि पुणे पोलीस यांनी विचारविनिमय करुन याबाबत निर्णय घेतला आहे. यानुसार पुढील पाच दिवस 8 ते 12 यावेळेत दुकाने सुरु राहतील. पुण्यातील 10 दिवसांचा लॉकडाऊन 23 जुलै रोजी मध्यरात्री संपणार आहे.

मागे

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाल....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्येत भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण
अयोध्येत भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण

अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्....

Read more