ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2020 08:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द

शहर : मुंबई

कोरोनाचा धोका वाढत असला तर राज्य आता अनलॉकच्या प्रक्रियेत आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारही पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचं पालन गेलं नाही तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन केली जाणार आहेत. ही पथकं हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

तसंच, दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू आहे का, प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, थर्मलगनद्वारे शरीराचे तापमान तपासणे, हवा खेळती, आवश्‍यक ते सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, चांगल्या प्रतीचे पेपर नॅपकीन, वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आदी मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांचे पालन होतं की नाही, यावर लक्ष ठेवण्याबरोबच नियमांच्या अंमलबजावणीचे काम विशेष पथक करणार आहे. शहरामधील पथकामध्ये मनपाचे कर्मचारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश असणार आहे. तर, ग्रामीण भागात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

मुंबई पालिकेचे हॉटेल्ससंदर्भातील काही नियम

मुंबईत हॉटेल्समध्ये टेबलाचे प्री-बुकिंग आवश्यक

ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही

दोन टेबलमध्ये कमीत कमी 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक

टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणं बंधनकारक

मागे

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारकडून लॉकडाऊनचे नियम श....

अधिक वाचा

पुढे  

सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता
सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार य....

Read more