ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

49A द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? घ्यावयाची काळजी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

49A द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? घ्यावयाची काळजी

शहर : मुंबई

          पॅन कार्डचा फॉर्म 49A काय आहे? पॅन कार्डसाठी जे कोणी अर्ज करत असतील त्यांना सर्वांना फॉर्म 49A बाबत माहिती पाहिजेच. तुमचा 10-अंकी पर्मनन्ट अकाऊंट नंबर अर्थात पॅन कार्ड मिळविण्यासाठी हा फॉर्म अनिवार्य आहे. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 139A अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून फॉर्म 49A जारी केला जातो.


        सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov या संकेतस्थळावर जा. तेथे पॅन कार्डसाठी फॉर्म 49A भरावा लागतो. पॅन कार्ड फॉर्म 49A खालील दोन लिंकद्वारेही डाउनलोड करता येईल.

https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/forms/49A_Form_Updated.pdf ,

https://www.tin-nsdl.com/downloads/pan/download/Form%2049A.PDF
 

          भारतातील नागरिक किंवा भारताबाहेर वास्तव्य करणारे भारतीय नागरिक फॉर्म 49A द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज दाखल करू शकतात. पण अर्ज करण्याआधी तुमच्याकडे आधीच एक पॅन कार्ड असेल किंवा तुमच्या नावाने आधी पॅन कार्ड जारी झालेलं आहे का हे आधी तपासा. एक पॅनकार्ड असताना दुसऱ्यासाठी अजिबात अर्ज करू नका. कारण, दोन पॅन कार्ड बाळगणं गुन्हा आहे.

 

फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी –
- फॉर्म 49A केवळ इंग्रजीतच भरावा. जे मुद्दे स्टार (*) केलेले असतील त्याबाबत माहिती देणं अनिवार्य आहे.

- फॉर्ममध्ये तुमचं पूर्ण नाव, लिंग, जन्मदिन, पालकांची माहिती, राहत्या घराचा आणि कार्यालयाचा पत्ता, संपर्क साधण्यासाठीचा पत्ता, फोन नंबर आणि इमेल आयडी आदी माहिती द्यावी.

- हा फॉर्म भरताना तुमची स्वाक्षरी चौकटीच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या.

- अर्ज भरताना अर्जदाराच्या नावावर नसलेलं ओळखपत्र किंवा घराचा पत्ता लिहू नये.

- सहीसाठी दिलेल्या चौकटीत तारीख, पद, रँक यांसारखी अनावश्यक माहिती देऊ नका.

- वडिलांचं नाव लिहिण्याच्या ठिकाणी पती किंवा पत्नीचं नाव लिहू नका

- आपण नाव आणि आद्याक्षरांचा संक्षिप्त वापर टाळावा.

- फॉर्म 49A मध्ये पत्ता लिहिताना पिन कोड चुकीचा लिहू नका. पिन कोडसोबतच फोन नंबर किंवा ई-मेल आयडी अचूक लिहावे.

- फॉर्म 49A भरताना खाडाखोड करु नये

- फॉर्मवर तुमचा फोटो चिकटवलेला चालेल पण त्यासाठी पिन किंवा स्टेपलरचा वापर करु नका
 

मागे

पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडचे सुपुत्र महेश तिडके शहीद
पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडचे सुपुत्र महेश तिडके शहीद

      नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी दुख:द ठरला आहे. बीड आणि साताऱ्....

अधिक वाचा

पुढे  

२६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'नो एन्ट्री'
२६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'नो एन्ट्री'

           प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चि....

Read more