By Pravin Pawar | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2021 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना आता रेल्वेने ( Local Pass ) प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी 2 डोस (Vaccination) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले पाहिजे. रेल्वे पाससाठी (Railway E-pass) सर्व स्थानकांवर अर्ज केला जात आहे. राज्य शासनाकडून आता ई-पास सुविधा ( E-Pass Service ) ही सुरु करण्यात आली आहे. How to apply for Universal Travel Pass for local train
युर्निव्हर्सल ट्रॅव्हल पास (Universal Travel Pass) असे याला नाव देण्यात आले असून यामुळे ई-पास मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. हा ई-पास मिळाल्यानंतर तुम्हाला रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार आहे.
ई-पास मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज? (Universal Travel Pass Registration)
सर्वात आधी तुम्हाला https://epassmsdma.mahait.org या लिंकवर क्लिक करायचे आहे.
2. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्ही वॅक्सीन घेताना जो मोबाईल नंबर दिला होता. तो नंबर भरायचा आहे.
3. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुम्हाला सबमिट करायचे आहे.
4. तुम्हाला यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर 48 तासात तुम्हाला एसएमएस येईल.
5. SMS आल्यानंतर तुम्ही ई-पास डाऊनलोड करु शकता.
हा ई-पास मिळाल्यानंतर तुम्ही तो तिकीट काऊंटरवर दाखवायचा आहे. यानंतर तुम्हाला पास मिळणार आहे.
ऑनलाईन ई-पास मुळे तुम्हाला ऑफलाईन पडताळणी करण्याची गरज राहणार नाही. थेट तिकीट काऊंटरवर जानून तुम्ही पास घेऊ शकता.
पेट्रोल-डिझेलच्या दराचा सामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो. त्यामु....
अधिक वाचा