निकालानुसार जनरल कोट्याकरता 4144 पद रिकामे होते यावर 4143 उमेदवारांची निवड झाली आहे. ओबीसीमध्ये 1999 पद भरण्यात आली आहेत. तसेच एसीमध्ये 1322, एसटीमध्ये 656 उमेदवार भरण्यात आले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या आणि 10 व्या पे कमिशननुसार महिन्याला 4,800 रुपये पगार लागू होईल. एसएससी परिक्षेदरम्यान पेपर लिक होण्याच्या गोष्टी समोर आल्या होत्या. या वादामुळे आयोगाने परिक्षेचा निकाल जाहिर करण्यावर बंदी आणली होती. मात्र आता तब्बल दीड वर्षांनी निकाल जाहीर झाला आहे. एसएससी दरवर्षी सात प्रकारच्या परिक्षांच आयोजन करतात यामध्ये टायर 1, टायर II, टायर III आणि टायर IV परिक्षा घेतल्या जातात. या परिक्षेत उमेदवाराला गणित, इंग्रजी विषयांबरोबरच संगणाचे ज्ञान आहे की नाही याची परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत तब्बल 15.43 लाख उमेदवारांनी सहभाग घेतला होता. यामधील 2 लाख उमेदवारांनी टायर II ची परिक्षा दिली होती. याचा निकाल जाहीर केला आहे.