ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

शहर : देश

सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. गृह मंत्रालयाने २०१६ पासून ते २०१९ पर्यंत भारतात आलेल्या नकली नोटांचा आकडा जाहीर केला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे भारतात पाकिस्तान हजार, ५०० आणि २०० च्या नकली नोटा पाठवत आहे. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं. दरम्यान, हजार, ५०० आणि २०० च्या नकली नोटा जप्त करण्याच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात मधून १२ कोटींपेक्षा जास्त नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम बंगालमधून १० कोटी आणि पंजाबमधून ५० लाख रूपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.त्यामुळे RBIने नागरिकांना सावधान करत नकली नोटा कशा ओळखाच्या सूचना दिल्या आहेत.

- बहुतेकदा नोटाच्या कागदावरून नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येऊ शकेल.

- नोटेवर  देवनागरीमध्ये २००० संख्या लिहिलेली असेल आणि मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र आहे.

- खऱ्या नोटांवर छोट्या लिपीमध्ये भारत आणि इंडिया लिहलेलं असेल.

- नोटेच्या पुढच्या बाजूला असलेल्या धाग्यावर भारत, आरबीआय आणि २००० असे लिहिलेले आहे.

- खऱ्या नोटेला एका बाजूला वाकवल्यानंतर धाग्याचा हिरवा रंग निळ्या रंगात बदलतो.

- गव्हर्नरच्या स्वाक्षर्यासह महात्मा गांधींच्या फोटोच्या उजवीकडे, प्रॉमिस क्लॉज हे रिझर्व्ह बॅंकेचे प्रतीक आहे.

 

मागे

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आर....

अधिक वाचा

पुढे  

गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारचे नेमके 3 अध्यादेश कोणते?
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारचे नेमके 3 अध्यादेश कोणते?

केंद्र सरकारच्या अवकृपेमुळे देशातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. शे....

Read more