ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एचएसबीसी बँकेमधील १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एचएसबीसी बँकेमधील १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शहर : विदेश

ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. यामुळे १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले.

'फायनान्शियल टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महिनाखेरीसी चालू तिमाहीचे निकाल समोर आल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात ४७०० कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. अधिक वेतन असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कामावरून कमी केले जाईल.

नोएल क्विन यांनी ऑगस्ट महिन्यात एचएसबीसीच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतली होती. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे गरजेचे होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलांची आवश्यकता आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्ध वाढल्यामुळे उद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे ही कपात होत असल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला.

यापूर्वी एचएसबीसीकडून भारतातील कार्यालयांमधून १५० कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि हैदराबादमधील कार्यालयांचा समावेश होता. जागतिक स्तरावर एचएसबीसी बँकेकडून व्यवस्थेची पुर्नबांधाणी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मागे

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार
राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लढाऊ विमान राफेल आणण्यासाठी ३ दिवसी....

अधिक वाचा

पुढे  

प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द
प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द

मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या काही दुरुस्तीच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या....

Read more