ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 05:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी

शहर : ahmedabad

                अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर्दानी २’ चित्रपटातील हाणामारीचे दृश्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये लाईव्ह पाहायला मिळाले. पडद्यावर चित्रपट सुरु असताना एक महिला दबंग बनून तिथे पोहोचली. तिने थेट कॉर्नर सीटवर बसलेल्या नवऱ्याला आणि त्याच्या प्रेयसीला खेचून बाहेर काढले व चोप दिला. अहमदाबादच्या आश्रम रोडवरील मल्टीप्लेक्समध्ये ही घटना घडली.

                  पतीला आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण केल्यानंतर तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनाही तो पर्यंत, महिलेने चित्रपटगृहात गोंधळ घातल्याचे समजले होते. नवरंगपुरा पोलीस ठाण्याचे पथक सिनेमागृहात पोहोचले व तिघांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. या प्रकरणात गुन्हा न नोंदवता पोलिसांनी तिघांना समजावून घरी पाठवले.

महिलेला कसे समजले
                  नवरंगपुर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला अकाउंटट असून ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुद्धा चालवते. सोमवारी दुपारी तिला एका मैत्रिणीने फोन करुन तुझा नवरा मर्दानी २ चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलाय असे सांगितले. त्यात ऐवढे खास काय आहे? असे तिने फोन करणाऱ्याला विचारले. त्यावर मैत्रिणीने ‘तुझा नवरा एकटा नाही, त्याच्याबरोबर एक महिला सुद्धा आहे असे सांगितले.” हे ऐकून संतापलेली महिला थिएटरमध्ये पोहोचली.

थिएटरमध्ये नेमकं काय घडलं
              सुरक्षा रक्षकाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाजूला करुन ती थेट आतमध्ये घुसली व नवऱ्याला दुसऱ्या एका महिलेसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. तिने आधी नवऱ्याच्या कानाखाली मारली. सोबत असलेली महिला तिला रोखण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी महिलेने तिला सुद्धा मारहाण केली. प्रेयसीसोबत आलेल्या या माणसाने आधी सलमान खानच्या दबंग ३ ची तिकिट काढण्याचा प्रयत्न केला. पण शो हाऊसफुल्ल असल्यामुळे त्याला तिकिट मिळाले नाही, त्यामुळे त्याने मर्दानी २ ची तिकिट काढली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर महिलेनेही नंतर कुटुंबाचा विचार करुन तक्रार नोंदवण्याचा निर्णय मागे घेतला.

मागे

अवकाळी हवामानाचा द्राक्षाला फटका
अवकाळी हवामानाचा द्राक्षाला फटका

              नाशिक - अवकाळी पावसामुळे आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळ....

अधिक वाचा

पुढे  

२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा
२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

             अफगाणिस्तान - दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्या....

Read more