By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bhopal
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक अजाब दांपत्य राहत असून पती सिंधी समाजातील आहे तर पत्नी ब्राह्मण समाजातील आहे. थंडीचे कारण देत पती आंघोळ करीत नाही. वारंवार परफ्यूम लावून अंगाचा वास झाकण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप करीत एका महिलेने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. वर्षभरात या दोघांचे नाते सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर या दोघांच्या नात्याला कटुता आली. पतीने दाढी वाढवायला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच दोघांमध्ये भांडणाची ठिणगी पडली. नवरा दाढी करीत नाही, आंघोळ करीत नाही, घरात स्वच्छता राखत नाही या कारणांवरून या महिलेने पतीपासून थेट वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटाविषयी कुटुंब न्यायालयात पतीने आपले म्हणणे मांडले. ‘माझे आयुष्य आहे. ते कसे जगायचे ते फक्त मीच ठरविणार. पत्नीने मला सांगण्याची गरज नाही.’ अशा शब्दांत या पतीने पत्नीला सुनावले. हे दांपत्य घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असून कुटुंब न्यायालयातील समुपदेशक या दोघांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुंबईतील माहीममध्ये निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने एका टॅक्सी....
अधिक वाचा