मालेगाव बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञासिंहांचं कोर्टाला उत्तर :“मला माहिती नाही”
By
SHEETAL CHAVAN | प्रकाशित:
जून 07, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : malegaon
मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळचीखासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (दि.७) मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले यावर ‘मला माहिती नाही’, अशा स्वरुपाची उत्तरे त्यांनी कोर्टासमोर दिली. कोर्टाने गेल्या आठवड्यात मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारी प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगत साध्वींनी कोर्टात हजेरील लावणे टाळले होते.त्यानंतर आज विशेष एनआयए कोर्टात साध्वींनी हजेरी लावली. दरम्यान, न्यायमुर्तींनी त्यांना प्रश्न विचारला की, आत्तापर्यंत ज्या साक्षीदारांकडे विचारणा झाली आहे त्यांच्याकडून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात स्फोट झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आपले काय म्हणणे आहे. यावर साध्वींनी ‘मला काहीही माहिती नाही’ असे उत्तर दिले. कोर्टाने मागील आठवड्यात या प्रकरणातील आरोपींना आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले होते.