By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2020 04:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लॉकडाऊनच्या काळात वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात गर्दी जमवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनय दुबेला आपण ओळखत नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. गेल्याच आठवड्यात विनय दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून रुपये पंचवीस हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता सुपूर्द केला होता. यावरुनही बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी अनिल देशमुख यांनी ट्विट करून यासंदर्भात खुलासा केला.
विनय दुबे याला मी ओळखत नाही, ८ दिवसापूर्वी मंत्रालयात
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 15, 2020
भेटायला आलेल्या visitors मध्ये एक रिक्षावाला होता. त्याने मंत्रालयात मुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे मला ₹२५००० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माझ्या चेंबर मध्ये दिला.
या ट्विटमध्ये देशमुख यांनी म्हटले आहे की, विनय दुबे याला मी ओळखत नाही. आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता. मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्यामुळे त्याने माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा २५ हजार रुपयांचा चेक सुपूर्द केला. त्यावेळी त्याच्यासोबत जो व्यक्ती होता, तो बहुदा विनय दुबे होता, असे देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, वांद्र्यातील घटनेबाबतही देशमुख यांनी भाष्य केले. १४ एप्रिलपासून ट्रेन नेहमीप्रमाणे धावतील, अशी चुकीची माहिती ११ मार्गांनी पसरवली गेली. त्याची माहिती व ज्या समाजमाध्यमांचा गैरवापर केला गेला त्या अकाऊंट्सचीही माहिती पोलिसांना मिळाली असून लवकरच कायदेशीर कारवाई सुरु होईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
राज्य सरकारने परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली त....
अधिक वाचा