ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोसासोबतच्या चटणीतून माझ्यावर विषप्रयोग; ISRO च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा खळबळजनक गौप्यस्फोट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 06, 2021 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डोसासोबतच्या चटणीतून माझ्यावर विषप्रयोग; ISRO च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा खळबळजनक गौप्यस्फोट

शहर : देश

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मधील एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक बाब सर्वांसमोर आणली. तपन मिश्रा यांनी असा खळबळजनक दावा केला आहे, की 23 मे 2017 मध्ये इसरो मुख्यालयात पदाच्या बढतीसाठीच्या मुलाखतीदरम्यान, घातक आर्सेनिक ट्राइऑक्साइड देण्यात आलं होतं.

दुपारच्या भोजनानंतर देण्यात येणाऱ्या हलक्या खाद्यपदार्थांमधून त्यांना डोसासोबत देण्यात आलेल्या चटणीतून हा विषप्रयोग करण्यात आला होता, अशी शक्यता त्यांनी सर्वांसमक्ष मांडली. सध्याच्या घडीला मिश्रा, इस्रोमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अहमदाबाद य़ेथे इस्रोच्याच Space Application Centre (SAC)मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळत होते.

'बऱ्याच काळापासून दडवून ठेवलेलं गुपित'

मिश्रा यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्याला, 'बऱ्याच काळापासून दडवून ठेवलेलं गुपित' असं नाव दिलं. प्रा. विक्रम साराभाई, डॉ. एस. श्रीनिवासन, श्री. नंबिनारायण यांच्या मृत्यूभोवती असणाऱ्या सर्व चर्चांचा संदर्भ देत काहीसा असाच प्रकार आपल्यासोबतही घडू शकतो याचा विचारही केला नव्हता अशा शब्दांत त्यांनी मनातील भीतीही या पोस्टच्या माध्यमातून मांडली.

पुढं त्यांनी लिहिलं, 'माझ्यावर Arsenic Trioxide चा वापर करत 23 मार्च 2017ला 23rd May 2017 विषप्रयोग करण्यात आला होता. ज्यानंतर मला जवळपास दोन वर्षे यासाठीचा उपचार घ्यावा लागला होता. त्यामुळं मी याबाबत कोणाला काहीच बोललो नव्हतो. मी नशिबवान आहे, कारण अशा पद्धतीचा विषप्रयोग झाल्यावर सहसा जगण्याची शक्यता कमीच. मी जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त होत आहे आणि मी इच्छितो की सर्वांनाच याबाबत माहिती व्हावी. कारण, माझा मृत्यू झालाच तर तो कशामुळं झाला, माझ्यासोबत काय घडलं होतं हे सर्वांनाच माहित असायला हवं.'

विषप्रयोग झाल्यानंतर अहमदाबादला परतलेल्या तपन मिश्रा यांना रक्तस्त्राव सुरु होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास अडचण, त्वचेचा एक थर निघणं, हात- पायाची नखं निघणं असा त्रास त्यांना होऊ लागला. न्यूरोलॉजिकल समस्या, जसंकी हापोक्सिया, हाडांचं दुखणं, स्पर्श, हलका हृदयविकाराचा झटका, शरीराच्या आत आणि बाहेरही फंगल इंफेक्शन जाणवू लागलं होतं.

कॅडिला अहमदाबाद, टाटा रुग्णालय मुबंई आणि एम्स दिल्ली येथून त्यांनी उपचार करुन घेतले. आपल्या या पोस्टसह तपन मिश्रा यांनी काही छायाचित्र आणि चाचण्यांचे अहवालही जोडले आहेत. सध्या त्यांच्या या पोस्टमुळं एकच खळबळ माजली आहे.

 

मागे

Bird Flu | देशातील सात राज्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने खळबळ, चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग
Bird Flu | देशातील सात राज्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने खळबळ, चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग

कोरोना पाठोपाठ देशात बर्ड फ्लूच्या संकटानं पाऊल ठेवलं आहे. देशातील 7 राज्या....

अधिक वाचा

पुढे  

Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी
Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची महाराष्ट्र पोलीस महासंचाल....

Read more