ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ,विनंती करतोय, आताच घरी थांबा, अन्यथा...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 02:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ,विनंती करतोय, आताच घरी थांबा, अन्यथा...

शहर : नागपूर

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने चार शहरं लॉकडाऊन केली आहेत. मात्र तरीही रस्त्यावरील गर्दी हटल्याने, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अक्शन मोडमध्ये आले आहेत. “विनंती करुनही घराबाहेर पडत असाल तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरी बसवू, ती वेळ आणू नका, आता विनंती करतोय, जबरदस्ती करायला लावू नका, आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितलं.

लॉकडाऊनचा अर्थ केवळ दुकानं आणि कार्यालये बंद करणे असा नाही, तर लोकांनीही घराबाहेर पडणे असा आहे. मात्र  अजूनही रस्त्यावर अनेक गाड्या, लोक दिसत आहेत. लोकांनी घरी बसणे गरजेचं आहे, वारंवार आवाहन करुनही नागरिकांना गांभीर्य नाही हे दु:खद आहे, अशी खंत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनचा अर्थ घरी थांबणे हा आहे. मात्र रस्त्यावर गाड्या, लोक फिरताना दिसत आहेत. आपण आपल्या सुरक्षेसाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी घरात थांबा. बाहेर फिरल्याने जर संसर्ग झाला तर त्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, माझी विनंती आहे, घराबाहेर पडू नका, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

नागपूर शहराला लॉक डाऊन केलं त्याची अंमलबजावणी सुरु आहे. मी अनेक भागाचा दौरा केलादुकानं बंद झाली आहेत, मात्र रस्त्यावर वाहने आणि नागरिक दिसून येत आहेत हे चुकीचं आहेही दुःखद गोष्ट आहे. नागरिकांनी गांभीर्याने घेतलं नाही. होम क्वारंटाईन हे जनतेसाठी आहे.

लॉक डाऊनचा अर्थ नागरिकांनी समजून घ्यावा हे सगळं नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. तरी जनता रस्त्यावर येत असेल तर याचा दुष्परिणाम होईल. आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मी पुन्हा विनंती करतो की नागरिकांनी घराबाहेर पडू नका. नाही तर आम्हाला फोर्स करून तुम्हाला घरी बसायला लावावं लागेल. आता तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतः हे करता की आम्हाला तुमच्यावर फोर्सफुली अॅक्शन घ्यायची, अशी विचारणा तुकाराम मुंढे यांनी केली.

आम्ही आढावा घेत आहोत त्यानुसार स्थिती नियंत्रणात आहे. मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर स्थिती बिघडू शकतेआम्ही नाका बंदी आणि पेट्रोलिंग सुरू केली आहे., असं मुंढे म्हणाले.

मागे

दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला
दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात  आला ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचं संकट वाढलं,रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचं संकट वाढलं,रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोनाबाधितांचा आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाबाधित....

Read more