By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गडचिरोली जिल्हा तसा फारच दुर्गम जिल्हा… अनेक वर्ष अनेक विकासकामं रखडलेल्या अवस्थेत… अनेक वेळा तिथल्या रुग्णांना दवाखान्यात जायचं म्हटलं तर जंगलातून काट्या-कुट्यातून वाट काढत जावे लागते. मात्र आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. याच रुग्णालयाचं आणि ज्यांनी हे रुग्णालय उभारण्यात मोलाची भूमिका बजावली त्या जिल्हाधिकाऱ्यांचं आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कौतुक केलं आहे. ‘हेच खरे यश…’ म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. (IAS Tukaram Mundhe Tweet Over Gadchiroli District Government Hospital)
तुकाराम मुंढे यांचं ट्विट
हे गडचिरोलीचं जिल्हा रुग्णालय आहे यावर विश्वास ठेवा… अतिशय प्रेरणादायी आणि ग्रेट वर्क असं ट्विट करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं अभिनंदन करत तुकाराम मुंढे यांनी त्यांची तारीफ केली आहे.
Believe it, it’s Government Hospital, Gadchiroli. Inspirational work ! Great work@DeepakSingla161, to transform District Hospital , Gadchiroli. Team Gadchiroli
मागे
आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टीईटी शिक्षकांनी शिकवणे बंधनकारक
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं टीईटीधारक शिक्षकांबद्दल मोठा निर्णय घेत....
अधिक वाचा