ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मू काश्मीरसह देशात ईद उत्साहात साजरी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मू काश्मीरसह देशात ईद उत्साहात साजरी

शहर : delhi

जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आज ईद असल्यामुळे तेथे लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले. दुकाने उघडली होती. एटीएम सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच टेलिफोन बूथही सुरू आहेत. परिणामी आज ईदनिमित येथे नमाज अदा करून खरेदी साठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याचे दिसत होते. सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत असल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान देशभरात ईद उत्साहात साजरी होत असल्याचे पाहायला मिळाले.

देशभरातील मुस्लिम बांधवांची ठिकठिकाणी नमाज अदा केली. दिल्लीतील जामा मशिदीतही नमाज अदा करण्यात आली. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईसह देशातील इतर भागातही ईद निमिताने उत्साहाचे वातावरण दिसत होते.

दिल्लीतील पंजा शरीफ दर्ग्यामध्ये भाजप नेते मुकतार अब्बास नक्वी यांनीही नमाज अदा केली. एकीकडे सार्‍या देशात नमाज अदा केली जात आसताना दुसरीकडे अनेकांच्या नजारा जम्मू कश्मीरकडे लागल्या होत्या, मात्र तेथील परिस्थितीही सर्वसामान्य आहे.

मागे

पूरग्रस्त कोल्हापुरात १२ ते २४ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश
पूरग्रस्त कोल्हापुरात १२ ते २४ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने आधीच चिंताग्रस्त असतांनाचा प्रशासनाने १....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तान 300 रुपये किलो टोमॅटो
पाकिस्तान 300 रुपये किलो टोमॅटो

जम्मू कश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरचे व्दिपक्षीय संबंध व अध....

Read more