ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 12:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

शहर : देश

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून सुरु झालेला हा सोहळा २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठाने पूर्ण होणार आहे. या मंदिरातील मुख्य गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती आहे. माता जानकीची मूर्ती नाही. त्याचे कारण ट्रस्टने दिले आहे.

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी प्रायश्चित्त पूजेने समारंभ सुरु झाला. आज मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीमुळे 20 आणि 21 जानेवारी रोजी रामलल्लाचे दर्शन बंद राहणार असल्याचे सांगितले. रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सर्व नद्यांचे जल आणण्यात आले आहे. सर्व जल कलश अयोध्येत पोहचले आहे. मंदिरातील गर्भगृहात ठेवण्यासाठी तीन मूर्ती तयार केल्या गेल्या. त्यातील कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांची मूर्तीची निवड करण्यात आली. परंतु ही मूर्ती फक्त भगवान श्रीरामाची आहे. त्यासोबत सीता माता किंवा लक्ष्मण नाही. त्याचे कारण ट्रस्टने दिले.

सीता माता का नाही ?

भगवान श्रीरामाची मूर्ती फूट इंच आहे. काळ्या शिळेपासून ही मूर्ती तयार केली आहे. 150 ते 200 किलोग्रॅम मूर्तीचे वजन आहे. या मूर्तीसोबत सीता माता नाही. कारण पाच वर्षांचे रामलल्ला म्हणजे बालक रुपात रामलल्ला आहेत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, भगवान राम पाच वर्षांचे असल्यामुळे सोबत जानकी नाही. एकटे राम आहेत. परंतु वरच्या मजल्यावर राम आणि सीता असणार आहे. तीन भाऊ असणार आहेत. तसेच हनुमानजी असणार आहे.

सर्व आखाड्यांचे संत राहणार उपस्थित

श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्व आखाड्यांचे संत, सर्व संप्रदायचे आचार्य, संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महंत, महंत, नागा साधू, आदिवासी, गिरिवास तटवासी, द्वीपवासी जनजाती उपस्थित राहणार आहेत. शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, पत्य, सिख, बौद्ध, जैन, दशनाम शंक रामानंद्र, रामानुज, निंबार्क, मद्धव, विष्णु नामी, रामसनेही, घीसा पंथ, गरीबदासी, गौडीया, कबीरपं वाल्मीकी, आसममधील शंकरदेव, माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रमगायत्री परिवार, अनुकूलचंद, ठाकूर परंपरा, ओरीसामधील महिमा समाज, पंजाबमधील अकाली, निरंकारी, नाम राधास्वामी तथा स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव उपस्थित राहणार आहेत.

 

मागे

1967 मध्ये जारी केलेला तो पोस्टल स्टॅम्प, ज्यावर लिहिले होते राम मंदिर अभिषेकाचे वर्ष
1967 मध्ये जारी केलेला तो पोस्टल स्टॅम्प, ज्यावर लिहिले होते राम मंदिर अभिषेकाचे वर्ष

नेपाळमधील 57 वर्षे जुने टपाल तिकीट व्हायरल होत आहे, जो एका आश्चर्यकारक योगाय....

अधिक वाचा

पुढे  

आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणारच, मनोज जरांगे पाटील इतके इरेला का पेटले?
आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणारच, मनोज जरांगे पाटील इतके इरेला का पेटले?

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न स....

Read more