ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर एअर इंडिया बंद करावी लागणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर एअर इंडिया बंद करावी लागणार

शहर : देश

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. जवळपास ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं खासगीकरण झालं नाही तर, लवकरच कंपनी बंद करावी लागणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. एअर इंडिया संदर्भातील प्रश्नाला उत्तर देत त्यांनी ही वस्तुस्थिती सर्वांपुढे ठेवली.

विमान संशोधन विधेयक 2020 राज्यसभेत साद करतेवेळी त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ज्यामध्ये त्यांनी एअर इंडियाचं खासगीकरण किंवा कंपनी बंद करणं हे दोनच पर्याय समोर असल्याचं स्पष्ट केलं. कंपनी बंद करण्याची परिस्थिती समोर असतानाच येत्या काळात नवा मालक मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

राज्यसभेत पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून सद्यस्थिपर्यंत केंद्राने एअर इंडियामध्ये ३० हजार कोटी रुपयांहून जास्तीची गुंतवणूक केली आहे. परिणामी ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही. मुळात एअर इंडिया ही कंपनी विकत घेणाऱ्यांना कंपनीवर असणारं कर्जसुद्धा घ्यावं लागणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीवरील बोलीसाठीचं मुल्य हे तिच्या मुळ अस्तित्वावर नसून एंटरप्राईज मुल्यावर असल्याचंही सांगण्यात येत आहे. परिणामी एअर इंडियाया कंपनीच्या भवितव्यासाठी आता बोली लावण्याची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळं इच्छुक कंपनी एअर इंडियासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत बोली लावू शकणार आहे.

 

 

मागे

आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट
आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट

भारतीय रेल्वेने  (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय....

अधिक वाचा

पुढे  

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेरात कैद
राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेरात कैद

राजस्थानच्या बुंदीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये ....

Read more