By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2020 08:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण देशात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. विमानतळांवर तर अधिक खबरदारी घेतली जात आहे. नव्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विमानतळांसाठींची नियमावली आता अधिक कठोर करण्यात आली आहे. आता विमानातून प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला जरी कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास विमानातील त्याच्या रांगेत बसलेल्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना सर्व टेस्ट करूनच प्रवास करावा लागणार आहे. साधारणपणे RT-PCR चाचणीसाठी 30 सेकंद लागतात. तर त्याचा रिपोर्ट येण्याासाठी चार ते सहा तास लागतात. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने टेक्निकल स्टाफची संख्या वाढवली आहे. भारत सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाइननुसार विमानातील एखाद्या रांगेतील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी तिष्ठत राहावे लागणार आहे.
अहवाल येईपर्यंत प्रवास नाही
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. जोपर्यंत त्यांच्या टेस्टचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना रोखून धरले जात आहे, असं या विमानतळावरील लॅबच्या प्रमुख डॉ. गौरी अग्रवाल यांनी ‘टीव्ही९ भारतवर्ष’शी बोलताना सांगितलं.
कालपासून ब्रिटनहून जेवढ्या फ्लाइट्स आल्या आहेत त्यातील पाच प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्ससाठी एनसीडीसी नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाचे नवे विषाणू आहेत की नाही? हे समजू शकणार आहे. जिनोम सिक्वेसिंगमध्ये थोडा वेळ जातो. त्यामुळे आता कोरोना झालेल्यांमध्ये स्ट्रेन आहे की नाही हे समजू शकेल, असं अग्रवाल म्हणाल्या.
शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटळला आहे. केंद्र सरकारन....
अधिक वाचा