ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इमारत लीगल असेल तर मृतकांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत : विजय वडेट्टीवार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 10:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इमारत लीगल असेल तर मृतकांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत : विजय वडेट्टीवार

शहर : ठाणे

भिवंडीत इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अजूनही सुरू आहे या इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमचे अधिकाऱ्यांशी चर्चाही केली इमारत कोसळणे मागं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं.वडेट्टीवार यांनी सांगितले की, जर ही इमारत लीगल असेल तर मृतकांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आलंय. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मात्र पस्तीस वर्षात खरंतर इमारत कोसळायला नको होतं परंतु इमारत कोसळली आहे त्यामुळे नोटीस देऊन देखील त्यांना इमारतीतून खाली करण्यात का नाही आलं याची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशन मुळे हा प्रकार घडला नाही ना किंवा या इमारती मध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का या सर्व गोष्टींची चौकशी देखील केली जाईल भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे.सुमारे तीस वर्षे जुनी जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करुन या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. दुर्घटनेत इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

मागे

एक कोटी मजुरांनी मार्च ते जूनदरम्यान पायी घर गाठलं, सरकारची संसदेत लिखित माहिती
एक कोटी मजुरांनी मार्च ते जूनदरम्यान पायी घर गाठलं, सरकारची संसदेत लिखित माहिती

कोरोना महामारीत संपूर्ण देश संकटात आहे. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस
मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस

पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही तास....

Read more