By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
शहरात स्वाईन फ्लू मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्वाइन फ्लूचे वाढते प्रमाण लक्षात घेत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता स्वाइन फ्लू नियंत्रित करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. खासगी डॉक्टर अधिकाधिक पैसा कमावण्यासाठी रुग्णाच्या विविध तपासण्या करत वेळ घालवतात. त्यामुळे अनेकवेळा रुग्णाच्या जीवावर उठते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने स्वाइन फ्लूचा रुग्ण दगावण्याचे वाढते प्रकार नाशिक शहरात वाढताना दिसताहेत. सर्दी, खोकला आणि पडशासारख्या किरकोळ आजारांच्या रूग्णांनाही टॅमी फ्लूचा डोस सक्तीने का द्यायचा आणि त्याच्या भविष्यातील दुष्परिणामांचे काय असाही सवाल डॉक्टर खासगीत करत आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू महामार्गावर कारमध्ये झालेला स्फोट हा सि....
अधिक वाचा