By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
शेवटच्या टप्यातील परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत या भीतीने नैराश्यग्रस्त असलेल्या इंडियन इन्स्टिटुट ऑफ टेक्नॉलॉजी,हैद्राबाद म्हणजेच आयआयटीच्या हैद्राबाद येथील विध्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.अॅड्र्युस चाल्स् अस त्याच नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की चाल्सने काही दिवसापूर्वीच शेवटच्या वर्षातील परीक्षा दिली होती. सध्या तो शेवटच्या टप्प्यातील प्रेझेंटेशनची तयारी करत होता.सोमवारी रात्री ११ वाजता तो वसतिगृहाच्या खोलीत गेला.दुसर्या दिवशी तो कुठेच न दिसल्याने आणि खोलीचे दारही उघडत नसल्याने त्याच्या मित्रांनी खोलीच दार तोडल.त्यावेळी त्याने गळफास लाऊन घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर आल.अशी माहिती संगरेड्डी येथील पोलिस अधिकारी पी.श्रीधर यांनी दिली. अॅड्र्युस चाल्स् हा डिझायनिंग क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत होता.त्याच्या खोलीत आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी सापडली ज्यामध्ये त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याबद्दल कुटुंबीय आणि मित्रांची क्षमा मागितली आहे.
मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे २४ जणांचा मृत्यू झाला. आकडेवारीवर ....
अधिक वाचा