By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 06, 2021 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'युपीएससी' (UPSC) ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, 'एमपीएससी' (MPSC) ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'एसईबीसी' (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या 'ईडब्ल्यूएस' (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होईल, अशी शक्यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.
दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत.
सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने दोन कोरोना व्हॅक्सीन (Corona Vaccine) ला वापरायची प....
अधिक वाचा