By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2024 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
रेल्वेने अयोध्येला निघालेल्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हा सोहळा याची देहा, याची डोळा अनुभवण्याची अनेक राम भक्तांची इच्छा आहे. त्यासाठी काहीजण अयोध्येला जाणार आहेत.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. काही विधी आधीच सुरु झाले आहेत. जगभरातील कोट्यवधी रामभक्त या प्राण प्रतिष्ठेच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशभरात राम मंदिर उद्घाटनाचा मोठा उत्साह आहे. प्रत्येक राम भक्ताला अयोध्येत उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार होण्याची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. यात होम हवन, सत्यनारायण महापूजा आणि शोभा यात्रांच आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 8 हजार जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे. अनेक व्हीआयपी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील.
या दरम्यान एक महत्त्वाची बातमी आहे. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आजपासून अयोध्येत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 22 तारखेपर्यंत अयोध्येत येणाऱ्या सगळ्या ट्रेन रद्द झाल्या आहेत. 24 तारखे नंतरच ट्रेनचे वेळापत्रक येणार आहे. महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनऊ, गोंडा, सुल्तानपूरला उतरावं लागणार आहे. त्यामुळे थेट अयोध्या रेल्वे स्टेशनवर उतरता येणार नाहीय. त्याआधी उतरुन अयोध्येत पोहोचाव लागणार आहे.
गाडीमधून रेकी करणाऱ्यांना घेतलं ताब्यात
अयोध्येत प्रवेश मिळवण इतक सोप नाहीय. 22 तारखेला कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बऱ्याच सुरक्षा तपासण्यानंतर अयोध्येत प्रवेश मिळणार आहे. कालच अयोध्येत गाडीमधून रेकी करणाऱ्या काही जणांना अयोध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेच्या आघाडीवर कुठलीही कमतरता किंवा चूक राहू नये, याची प्रचंड काळजी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच अयोध्या रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाची लढाई आता निर्णायक स्थिती येऊन पोहचली आहे. मराठा आरक्षणासाठ....
अधिक वाचा