ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2020 09:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

शहर : मुंबई

कोविड-१९च्या (Covid-19) पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासासाठी (Railway travel) काही बंधने आजही लागू आहेत. मात्र, सर्वसामान्यांना लोकलचा (Local) प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास (long distance traveling )करणाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकावर (Railway station) येणाऱ्या प्रवाश्यांसाठी मुंबई लोकलने प्रवास (Mumbai local travel) करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीने प्रवास करायचा असेल त्यावेळी कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन केले आहे. त्याचवेळी लोकलमध्येही याचेही पालन करण्यात यावे. लांब पल्ल्याच्या गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला लोकल रेल्वेचे तिकीट काढावे लागणार आहे. (Railway granted permission to long distance traveling  by suburban train services) हे तिकीट सहा तास अधिकृत असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी आधी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, बँक कर्मचारी यांना प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने महिला, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली. पत्रकार आणि कॅमेरामन, वकील यांनाही परवानगी दिली. कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करताना वैध ओळखपत्र  सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले. मात्र, आता लांब पल्ल्याच्या गाड्यांतून आल्यानंतर तसेच प्रवास करण्यासाठी लोकलची मुभा देण्यात देण्यात आली आहे.

मागे

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट....

अधिक वाचा

पुढे  

नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं
नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं

देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. अमर रहेच्....

Read more