By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आंध्रप्रदेश - राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील असलेल्या महिलांसाठी महत्वाची म्हणजेच 'अम्मा वोडी' ही योजना जाहीर केली आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबातील महिलांची मुलं-मुली शाळा किवा कॉलेजांमध्ये शिकत आहेत, त्यांच्या भविष्याचा विचार करून ही योजना राबवण्यात आली आहे.
दरम्यान, ही योजना आंध्रप्रदेश सरकारची असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये जमा केले जातील. हे पैसे महिलांच्या खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होतील या योजने अंतर्गत अशी हमी दिली आहे. तसेच ज्या विद्यार्थांचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या योजने अंतर्गत ही मदत दिली जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. जास्तीत जास्त मुलं शिकावी तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षात ६४५५ कोटीं रुपयांना मंजूरी देली आहे.
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय डॉक्टरांअभावी चाल....
अधिक वाचा