ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कठीण काळात आम्ही दिल्लीसोबत, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 09:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कठीण काळात आम्ही दिल्लीसोबत, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शहर : देश

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबतर्फे दिल्लीचे प्रशानन आणि नागरिकांना शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीला दिले आहे. सोबतच, पंजाबमध्ये कोरोना योद्ध्ये ज्या प्रकारे कोरोनाशी दोन हात करत आहेत, त्यांच्या या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली आहे.

देशाची राजधानी दिल्ली सध्या कठीण काळातून जात आहे. दिल्लीची लढाई सुरुच आहे. अशा कठीण काळात आम्ही दिल्लीला जमेल तशी मदत करण्यास तयार आहोत. आम्ही दिल्लीकरांच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध राहू.” असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. तसेच, कोरोची दुसरी लाट कधी येईल हे कुणीही सांगू शकत नाही. राजधानी क्षेत्र आणि इतर राज्यांचे अनुभव पाहून देशात कोरोनाची दुसरी लाट निश्चितपणे येणार असं वाटत आहे , अशी शक्यताही सिंग यांनी व्यक्त केली.

दिल्लीत शनिवारी कोरोनाचे 5879 नवे रुग्ण

दिल्लीत कोरनाग्रस्तांच्या आकड्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्लीत शनिवारी तब्बल 5879 नवे कोरोनाबाधित आढळले. तसेच, शनिवारी एकूण 111 बाधितांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये शनिवारी 6963 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 23 हजार 117 वर गेला आहे. तर आतापर्यंत एकूण 8270 जणांचा कोनोमुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये 39741 सक्रिय रुग्ण आहेत.

मास्क वापरणाऱ्यांविरोधात दिल्ली प्रशासनाकडून कठोर कारवाई

दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन दिल्ली प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये मास्क वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे. यावेळी, शनिवारी मास्क वापरल्यामुळे दिल्ली पोलिसांनी एकूण 1306 नागरिकांवर कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण 5 लाख 1 हजार 328 नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे 3378 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मागे

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!
दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!

राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू
कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक राज्यांनी आता ....

Read more