By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दादर : दादर रेल्वे स्थानकावर एक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल मदतीला धावून आल्यामुळे एका २५ वर्षीय युवकाचे प्राण वाचविल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. अंकित शुक्ला (२५) हा युवक शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर उभा असतांना अचानक त्याला चक्कर आली व तो रेल्वे रुळावर पडला.
त्याचदरम्यान रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भाडाळे सहकाऱ्यासमवेत तेथे गस्तीवर उपस्थीत होते. त्यांचे लक्ष रुळावर पडलेल्या अंकितवर गेले. त्यांनी लगेच उडी मारुन रुळावर पडलेला अंकितला पोलीस निरीक्षक भाडाळे आणि महाराष्ट्र सुरक्षा पथकाच्या दोन जवानांनी अंकितला उचलून प्लॅटफॉर्मवर आणले.
भाडाळे यांनी त्यानंतर अंकितला आपल्या खांद्यावर उचलून घेतले. त्यांनी अंकित शुक्लाला सायन रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी भाडाळे यांच्या समयसूचकतेचे कौतुक केले आहे. भाडाळे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अंकितचे प्राण वाचले.
मुंबई : भारतात ३ फेब्रुवारी १९२५ रोजी विजेवर धावणारी पहिली र....
अधिक वाचा