By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - कोल्हापरापाठोपाठ आता मुंबईतही मटणाचे दर कडाडले असून इथे मटणाचा दर किलोमागे 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही दिवसापूर्वी हा दर 500 रुपये इतका होता. 25 डिसेंबरनंतर थेट 100 रुपयांची वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या भाववाढीची झळ सोसणार्याण मटणप्रेमींना या वर्षाचा शेवट तरी चांगला जाईल, अशी आशा होती. मात्र नवीन वर्ष सुरू होईपर्यंत मटणाचे दर चढेच राहणार असल्याने त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.
देवनार इथला कत्तलखाना पश्चिम हिंदुस्थानातील स्वस्त आणि प्रसिद्ध कत्तलखाना माहे. इथे दर गुरुवारी आणि शनिवारी जवळपास 20 ते 30 हजार बकन्या कापण्यासाठी आणल्या जातात. या बकर्या प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानातून आणल्या जातात, गेल्या काही महिन्यांपासून या बकर्या देवनार इथे आणण्याऐवजी कर्नाटक, केरळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विकल्या जात आहेत. त्यामुळे देवनार कत्तलखान्यात बकऱ्या येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
महाराष्ट्रापेक्षा बक-यांना गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये विकून नफा कमावतात असं निदर्शनास आले आहे. बकर्यां चे कारखान्यात येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मागणी वाढली आहे पण पुरवठा कमी झाला आहे. साहजिकच आहे यामुळे मटणाचे दर वाढले आहेत. कोल्हापुरात मटण दरवाढीला सुरूवात झाली होती. आणि गेल्या महिन्यात आसपासच्या परिसरामध्ये मटणविक्रेत्यांनी मटणाच्या दरात किलोला दोनशे रुपयांपर्यंत वाढ केली.
कोल्हापुरात मटण आवडीने खाणांर्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या दरवाढीला मोठा विरोध झाला. दर कमी करण्यासाठी आंदोलन सुरू झाले. याचे पडसाद कोल्हापुरातील महापालिकेमध्येही दिसून आले. राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात दरवर्षी बकर्यांलचे प्रमाण वाढलेले असायचे. मात्र अवकाळी पावसामुळे अनेक बक-यांना मृत्यू झाला.
मटणदरवाढीने हैराण झालेल्या काही नागरिकांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना दरवाढीप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थाच्या मागणीचा विचार करत मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अन्यथा दुकाने बंद करा अशा नोटीसा मटण विक्रेत्याना बजावल्या होत्या.
मटणाप्रमाणेच अडयांचेही दर वाढायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी किरकोळ बाजारात त्यांचे दर प्रति डझन 60 रुपयांवरुन 70 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. थंडी वाढल्याने हे दर शेकड्यामागे 15 ते 20 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या शहरांच्या आसपासच्या सगळ्या परिसरात मिळून जवळपास सव्वा लाख अंडी विकली जातात. त्यातच अवकाळी पावसाने मृत कोंबड्याचे प्रमाण वाढले. सोबतच पशुखाद्य महागल्याने पोल्ट्री फार्म चालवणारर्या कोबड्यांच्या दरात वाढ केली आहे.
माकडांना बिस्कीट देताना तोल गेल्याने सुमारे दोनशे फूट दर....
अधिक वाचा