By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : भारतातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहनांची ट्राफिक असणार्या बेंगळुर शहराचा टॉप १० च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतातील ४ शहरांचा या यादीत समावेश केला आहे. यात मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. भारताची राजधानी दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. शहर मोबिलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने व लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट टॉमटॉम च्या एका सर्व्हेत ही माहिती मिळालेली आहे.
दिल्लीतील नागरिकांचा पिक अवर्स दरम्यान गाडी चालवताना अन्य शहरांच्या तुलनेत वर्षाला १९० तासांहून अधिक वेळ वाया जात आहे. २३ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये सर्वाधिक ट्रॅफिक पहायला मिळाली. दिल्लीतील ट्राफिक ८१% वर पोहचले आहे. २३ ऑक्टोबर दिवशी शेकडो दिव्यांग विद्यार्थी रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून मंडी हाऊससमोर आंदोलनाला बसले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जगभरातील ५७ शहरात सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर बेंगळुरू शहर आहे. पुणे पाचव्या स्थानावर आहे. टॉप १० च्या शहरात मनीला दुसऱ्या स्थानावर, बगोटा तिसऱ्या स्थानावर, मॉस्को सहाव्या स्थानावर, लीमा सातव्या स्थानावर, इंस्ताबुल नवव्या आणि जकार्ता दहाव्या स्थानावर आहे.
मुंबई : भारतीय संरक्षण दलात सेवा करण्याची महत्वाकांक्षा असणार्या....
अधिक वाचा