By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राच्या सहाय्याने सैन्यामधील ११०० सैनिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यामुळे सैनिकांच्या मानसिक तणावाचा प्रश्न उपस्थितीत केला आहे. गेल्या १० वर्षात लष्करात ८९५ सैन्यांनी, हवाई दलात १८५ सैन्यांनी, तर नौदलात ३२ जवानांनी आत्महत्या केली आहे.
सैनिकांचे मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये योगा, डाएट, समूपदेशन, कपड्यांसंदर्भात बदल करण्यात आले आहेत. सैन्यदलातील मानसिक आरोग्य हा महत्वाचा मुद्दा आहे. भारतासह अमेरिकेतदेखील सैन्यदलात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये अमेरिकेत सैन्यदलच्या ५४१ जवानांनी आत्महत्या केली आहे.
सैनिकांना घरातील भांडणे, आर्थिक अडचणी आणि वैवाहिक समस्या अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पूर्वी जवानांना त्यांच्या घरून फक्त एकच पत्र मिळत असे, मात्र आता २४ तास मोबाइल असल्याने त्यांचा घरच्यांशी कधीही संपर्क होऊ शकतो. या कारणामुळे ताण-तनाव वाढत जात असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
सांगली : रविवारी सांगलीत वेगवेगळ्या अपघातांमध्ये १७ जण....
अधिक वाचा