By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील माहीममध्ये निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने एका टॅक्सीतून ३ कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस तपास करत असून, काळ्या पिवळ्या टॅक्सीत २ व्यक्तींकडून ही रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या रकमेत विविध देशांचे चलन असल्याचे पुढे आले आहे. तर, निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केलीय. विदेशी चलनाचे भारतीय मूल्य सुमारे तीन कोटी रुपये इतके असल्याची माहिती माहीम विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी दिलीय. तसेच, या विदेशी चलनाप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आलीय. माञ, हे चलन नेमके कोणत्या कारणासाठी आणण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
भारतीय जवानांनी केलेल्या लष्करी कारवाईचा राजकीय वापर होत असल्याने काही मा....
अधिक वाचा