By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलार्मचे सूचना फलक आता मराठी संदेशात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. याआधी सर्व लोकलमधील अलार्मचे सूचना फलक हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहीले होते. त्याविरुद्ध अलार्मच्या सूचना फलकावर काही आज्ञातांनी या ठिकाणी "मराठी हवीच" असे स्टिकर लावले होते. तसेच या स्टिकरचे संदेश पाहून रेल्वे प्रशासनाने यावर ताबडतोब दखल घेत मराठी संदेश असलेले अलार्म लोकलमध्ये झळकावले आहेत.
इंग्रजी आणि हिंदी भाषेत असणारे फलक कायम ठेवून त्यावर मराठीत संदेश असलेला लहान फलक प्रथमस्थानी लावण्यात आला आहे. "गाडी उभी करण्यासाठी साखळी ओढावी" आणि इतर संदेश असलेले फलकही मराठीतून नमूद केले गेले आहे. आंदोलन न करता आज्ञातांनी लावलेल्या स्टिकरचा मान राखीत रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेतून सूचना फलक लावल्याचे पाहून मराठी भाषिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई : अमेरिकेचे प्रसिद्ध बास्केटबॉलपटू "कोबी ब्रायंट" ....
अधिक वाचा