By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - वर्षअखेरीस मुंबई आणि परिसरात थंडीचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांत पुन्हा तापमानात वाढ झाली. मात्र, पुढील दोन दिवसांत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाऱ्याची उत्तर-पश्चिम दिशा बदलून दक्षिण-पूर्व झाल्यामुळे रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामु़ळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातदेखील तापमानात वाढ दिसून आली.
राज्यात बुधवारी कमाल आणि किमान तापमानात सर्वत्रच वाढ झालेली दिसली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात १४ ते १९ अंश सेल्सिअस होते. तर राज्यात सर्वत्र कमाल तापमान २७ ते ३३ अंश नोंदविण्यात आले. मुंबईत कमाल तापमान ३०.४ अंश, तर किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस होते.
विदर्भात गोंदिया येथे बुधवारी सांयकाळपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली. आज विदर्भात काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
झारखंड – उत्तर भारतासह अनेक राज्य थंडीने गारठली असून जमशेदपूर य....
अधिक वाचा