ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड

शहर : देश

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.याबाबत शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत भाष्यही केले. त्यांनी म्हटले की, सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद असल्याची खोचक टिप्पणी यावेळी पवार यांनी केली. तसेच आपण या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले. कारण वेळेत उत्तर दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.तत्पूर्वी शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत राज्यसभेत कृषी विधेयकांना घाईगडबडीत देण्यात आलेल्या मंजुरीवर टीका केली. कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.

 

 

मागे

मंत्रिमंडळाची आज बैठक; मराठा समाजासाठी राज्य सरकार 'हे' मोठे निर्णय घेण्याची शक्यता
मंत्रिमंडळाची आज बैठक; मराठा समाजासाठी राज्य सरकार 'हे' मोठे निर्णय घेण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरक....

अधिक वाचा

पुढे  

धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर पाठींबा दिलाय.  आदिवासींच्य....

Read more