ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई महानगरात 2 लाख 83 हजार फ्लॅट्स विक्रीअभावी पडून

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई महानगरात 2 लाख 83 हजार फ्लॅट्स विक्रीअभावी पडून

शहर : मुंबई

2 लाख 83 हजार सदनिका विक्रीअभावी तशाच पडून आहेत. बांधकाम क्षेत्राला तेजी येईल आणि आपल्या सदनिका विकल्या जातील, या आशेवर विकासक विसंबून आहेत. अशीच स्थिती 1997 मध्ये उद्भवली होती. मात्र त्यावेळी विकासकांनी घरांच्या किमती तब्बल 40 टक्क्यांनी उतरवल्या होत्या. त्यानंतर या क्षेत्रात तेजीचे वातावरण तयार झाले होते. 
गेल्या 4 वर्षांमध्ये सदनिकांच्या किमती  विकासकांनी वाढवलेल्या नाहीत. मात्र मुद्रांक शुल्क आणि इतर कर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्या परवडत नाहीत. किमती कमी केल्या तर विकासकांना अपेक्षित असलेला नफा कमी होतो. त्यामुळेच किमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत. 2006-07 या कालावधीत बांधकाम क्षेत्र तेजीत असल्यामुळे विकासकांच्या नफ्याचे प्रमाण 30 टक्क्यांच्या आसपास होते. आता ते केवळ 8 टक्क्यांवर आल्याचे एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे म्हणणे आहे. जागांच्या किमती वाढल्या, बांधकाम साहित्याचे दर वाढले तसेच इतर परवानग्या, रेरा नोंदणी आणि जीएसटी या सर्वांमुळे नफ्याचे प्रमाण कमी झाल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. 
जे प्रस्थापित विकासक आहेत त्यांनी बर्याच वर्षांपूर्वी जागा खरेदी करून इमारती बांधल्या, त्यांना फारसा फरक पडलेला नाही कारण त्यांनी ज्यावेळी जमिनी खरेदी केल्या त्यावेळी त्यांचा दर कमी होता. अलिकडे ज्यांनी जागा खरेदी केल्या आहेत त्यांना मात्र पडून राहिलेल्या सदनिकांमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. 
गेल्या काही वर्षांमध्येविकासकांनी आपल्या सदनिकांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवल्या. 2005 नंतर तयार झालेल्या बांधकामांचे दर 35 टक्क्यांनी वाढवण्यात आले. साहजिकच सर्वसामान्य माणसांनी सदनिका खरेदी करताना आखडता हात घेतला. परिणामी सदनिका पडून राहण्याचे प्रमाण वाढले. 15 वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाल्यानंतर 3 वर्षांतच तो प्रकल्प पूर्णत्वास जाऊन नागरिकांना सदनिकांचा ताबा मिळत होता. आता अनेक ठिकाणी हा काळ 6 वर्षांपर्यंत लांबल्याची उदाहरणे आहेत. अनेक विकासकांनी यातून मध्यम मार्ग काढण्यास सुरूवात केली आहे. सदनिकांची रक्कम एकदम न घेता टप्प्याटप्प्याने स्वीकारण्याची योजना आणण्यात आली. तसेच काही विकासकांनी मुद्रांक शुल्क स्वतःच भरण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही सदनिकांना म्हणावा तसा उठाव नाही. त्यातही सदनिकेची संपूर्ण किंमत चेकद्वारे स्वीकारण्याची तयारी असलेले फारच कमी विकासक आहेत. विक्री कमी होण्यामागे हे एक कारणही आहे.

मागे

विठ्ठल-रुखमाई मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास, तर दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य
विठ्ठल-रुखमाई मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास, तर दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे झेंडूच्या पिवळ्या ज....

अधिक वाचा

पुढे  

धुळ्यामध्ये गॅसचा स्फोट, चौघे जण जखमी
धुळ्यामध्ये गॅसचा स्फोट, चौघे जण जखमी

धुळ्यामधील देवपूरमधील गल्ली नंबर 7 एकवीरा देवी मंदिराजवळील एका घरात अचानक ....

Read more