By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था तळाला पोहचली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर आणखी घटला आहे. आर्थिक वर्ष २०१९- २० मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज हा फक्त ४.८ राहणार आहे. भारताचीच अर्थव्यवस्था सुस्तावल्याने आता जगातील वाढीचा अंदाज कमी करावा लागणार आहे. आयएमएफने केलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत विकासदराचा अंदाज घटल्याचा दावा केला आहे.
आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गगीता गोपीनाथ यांनी जागतिक वाढीच्या अंदाजात ८० टक्के घसरणीकरिता भारत जबाबदार असल्याचे सांगितले आहे. २०१९ चा जागतिक विकासदर २.९ टक्के आणि २०२० साठी त्याच विकासदराचा अंदाज ३.३ टक्के नोंदविण्यात आला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात ०.१ टक्क्यांनं कमी आहे.
गैर बँकिंग वित्तीय क्षेत्रात असलेली उदासीनता आणि ग्रामीण क्षेत्रात उत्पन्नात आलेल्या कमीमुळे भारताचा आर्थिक विकासदर घटल्याचंही त्यांनी सांगितले. २०२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ५.८ टक्के आणि २०२१ मध्ये ६.५ टक्के होऊ शकते. भारताला प्रगती करताना आम्ही पाहत आहोत. पण सरकारसमोर सर्वात मोठी समस्या एनपीएची आहे, असंही त्या म्हणाल्या.
ओडिसा : देशभरात वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार्यांच्या....
अधिक वाचा