By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 01, 2020 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतात गेल्या 16 दिवसांमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये 16 पट वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 16 दिवसात देशातील ‘कोरोनाग्रस्तां’चा आकडा 1600 च्या उंबरठ्यावर आहे. मंगळवार 31 मार्चला एका दिवसातच तब्बल 315 नवे रुग्ण आढळले. एक मार्चपर्यंत भारतात केवळ तीन कोरोनाबाधित होते, तर 15 मार्चला हा आकडा 98 वर पोहोचला होता. म्हणजेच ही संख्या शंभरच्या आत होती. परंतु 31 मार्चला देशातील ‘कोरोनाग्रस्तां’ची संख्या 1618 वर गेली आहे. भारतात ‘कोरोना’च्या प्रसाराचा वेग या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे.
सर्वात चिंताजनक स्थिती गेल्या तीन दिवसात उद्भवली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 28 मार्चला 918 वर असलेली भारतातील रुग्णसंख्या 626 ने वाढली आहे. ‘कोरोना’मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही 20 दिवसांमध्ये एकावरुन 50 च्या पुढे गेली आहे.
गेल्या बारा तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 240 ने वाढ झाली आहे. एक एप्रिलला दुपारपर्यंत हा आकडा 1637 वर आहे. यापैकी 133 जण उपचारानंतर बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 1466 जण अजूनही आजाराशी लढा देत आहेत.
महाराष्ट्रात स्थिती काय?
महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबईतच आठ बळी गेले आहेत. कालच्या (मंगळवार 31 मार्च) दिवसभरात राज्यात 72 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण होते. मुंबईतील कालचे आणि आतापर्यंतचे आकडे पाहता काही तासातच 75 रुग्णांची भर पडल्याचं चित्र आहे. मुंबईत आता 167 कोरोनाग्रस्त असून पुण्यात 38 कोरोनाबाधित आहेत.
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोप....
अधिक वाचा