ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३० लाखांवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३० लाखांवर

शहर : देश

कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेकचा थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.

भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार २३९ नव्या रुणांची नोंद झाली असून ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ५६ हजार ७०६ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात लाख हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरू असून २२ लाख ८० हजार ५६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या २४ तासांत १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आत्तापर्यंत .४४ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

मागे

जाणून घ्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली
जाणून घ्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली

यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज द....

अधिक वाचा

पुढे  

Corona Vaccine | येत्या 73 दिवसात भारतात कोरोना लस, मोफत लसीकरण, ऑक्स्फोर्ड विद्यापिठाचा दावा
Corona Vaccine | येत्या 73 दिवसात भारतात कोरोना लस, मोफत लसीकरण, ऑक्स्फोर्ड विद्यापिठाचा दावा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरो....

Read more