ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण

शहर : देश

देशामध्ये सध्या कोरोना संकटात लसीची तीव्र कमतरता आहे. काही राज्यांमध्ये, 18-45 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण बंद केले गेले आहे. अशा परिस्थितीत, मॉडर्ना आणि फायझर सारख्या लसींकडे नवीन आशा म्हणून पाहिले जात आहे. परंतु आता असे दिसत आहे की, बहुतेक भारताला यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वास्तविक असे सांगितले जात आहे की, भारताच्या आधी असे बरेच देश आहेत ज्यांनी फाइजर आणि मॉडर्ना यांना कन्फर्म ऑर्डर दिले आहे आणि तेही याची प्रतीक्षा करत आहेत. मॉडर्ना आणि फायझर बनविणार्‍या कंपन्यांनी या देशांना 2023 पर्यंत लस पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत या लसींसाठी भारताला बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोमवारी ही बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही मान्य केली आहे. सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, आम्ही फायझर आणि मॉडर्नासाठी केंद्रीय स्तरावर बोलणी करत आहोत. परंतु बहुतेक वेळा त्यांच्या ऑर्डर फूल असतात. आता ते त्यांच्यावर आहे की, ते भारताला किती डोस पूरवू शकतात हे.

केंद्राचे हे विधान अशा वेळी आले आहे. जेव्हा अलीकडेच दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले की, "आम्ही मोडेर्ना आणि फायझरच्या डोसबाबत बोललो होतो, पण ते म्हणतात की, आम्ही तुम्हाला लस देणार नाही, आम्ही केंद्र सरकारशी यावर चर्चा करू." मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही आधीच बराच वेळ गमावला आहे, माझे केंद्र सरकारला आवाहन आहे की, केंद्र सरकारने त्यांच्याशी बोलावे आणि लस आयात करुन ती राज्यांना द्यावी.

लसीचा तिसरा डोस

दुसरीकडे, कोरोनाच्या लढ्यात शस्त्र म्हणून प्रभावी लसींचा तिसरा डोसही लवकरच येणार आहे. भारतबायोटेकच्या वतीने देशात बूस्टर डोसची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सोमवारपासून एम्स नवी दिल्ली येथे ट्रायल सुरू झाला आहे. या व्यतिरिक्त आणखी 8 साइट्स आहेत ज्यामध्ये त्या लोकांना हा तिसरा डोस मिळणार ज्यांनी या आधी पहिल्या दोन डोस घेतल्या आहेत, ज्याचा परिणाम 6 महिन्यांत समोर येईल.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एंटीबॉडी किती काळ राहतात हे जाणून घेण्यासाठी बूस्टर डोस हे एक चाचणी माध्यम आहे. वैज्ञानिक पुराव्यांसाठी ही चाचणी फार महत्वाची आहे.

मागे

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा

ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकलने, मेट्रोने प्रवास करण्....

Read more