By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
गेल्या 70 वर्षापासून हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या खटल्यात ब्रिटनच्या हायकोर्टाने अखेर भारताच्या बाजूने निकालाचा कौल दिला आहे . भारताच्या फाळणीच्या वेळी निजामाची लंडनच्या एका बँकेत जमा असलेल्या रक्कमेबाबत भारत पाकिस्तान मध्ये खटला सुरू होता.या रकमेवर भारत आणि निजामाच्या उत्तराधिकारीचा अधिकार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.
गेल्या 70 वर्षांपासून हा खटला सुरु होता. निजामाचे वंशज प्रिन्स मुकर्रम जाह आणि त्यांचे धाकटे बंधू भाई मुफ्फखम जाह यांनी या खटल्यात भारत सरकारची साथ दिली. फाळणी झाली तेव्हा हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खानने लंडनमधील नेटवेस्ट बँकेत 1007940 पौंड म्हणजे जवळपास 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते.
निजामाने जमा केलेली ही रक्कम आता 35 मिलियन पौंड म्हणजे 3 अब्ज 8 कोटी 40 लाख रुपये झाली आहे. या मोठ्या रकमेवर भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्राकडून दावा करण्यात आला. हैदराबादचा सातवा निजाम उस्मान अली खान या रकमेचे मालक होते आणि त्यांचे वंशज, भारत हे आता दावेदार आहेत, असं लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायमूर्ती मार्कस स्मिथ यांनी स्पष्ट केलं.
नुकतेच देशपातळीवर रेल्वेच्या स्थानकावरील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात आ....
अधिक वाचा