By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नागपूर - गेल्या वर्षी २०१९मध्ये देशात ११० वाघांचा मृत्यू झाला असून त्यात शिकार करण्यात आल्यामुळे एक तृतीयांश वाघांचा मृत्यू झाला असल्याचं आढळून आलं आहे. वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात मध्यप्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचंही आढळून आलं आहे. तर गेल्या वर्षात देशात एकूण ४९१ बिबट्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे.
२०१८ मध्ये ३४ वाघांची शिकार करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी ३८ वाघांची शिकार करण्यात आल्याचंही आढळून आलं आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या पाहणीनुसार मध्यप्रदेशात सर्वाधिक म्हणजे २९ वाघांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी १२ वाघांचा मृत्यू झाला असून राजस्थान आणि केरळमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी ३ वाघांचा मृत्यू झाल्याचंही या सर्व्हेत दिसून आलं आहे. उत्तर प्रदेशातही ६ वाघांचा मृत्यू झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
यंदा महाराष्ट्रातील वाघांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील काही वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून काही वाघांची शिकार करण्यात आल्यानं मृत्यू झाल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात झालं आहे. २०१८मध्ये एकूण ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर यंदा ४९१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी एकट्या महाराष्ट्रातच ९७ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचंही आढळून आलं आहे. दरम्यान, नॅशनल टायगर कंझर्व्हेशन अथॉरिटी (एनटीसीए)च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशात केवळ ९२ वाघांचा मृत्यू झाला आहे. एनटीसीच्या सर्व्हेनुसार २०१८मध्ये १०२ वाघांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात तब्....
अधिक वाचा