By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
पाकिस्ताननं युनेस्कोमध्ये काश्मीर आणि अयोध्येचा प्रश्न उठवल्यानंतर भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असल्याचं भारतानं युनेस्कोमध्ये ठामपणे सांगितलं. अनन्या अग्रवाल यांनी युनेस्कोमध्ये भारताची बाजू मांडली. पाकिस्तान भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीकाही भारतानं केली. पाकिस्तानकडून त्यांचे मंत्री शफकत महमूद यांनी त्यांची बाजू मांडत काश्मीर जनतेच्या मुलभूत अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पॅरिसमधील यूनेस्को मुख्यालयात आयोजित यूनेस्कोच्या सर्वसाधारण बैठकीत 40व्या सत्रा सामान्य नीतीवर चर्चा सुरु असताना पाकिस्तानने भारतावर आरोप केल. यावर भारताने पाकिस्तानला उत्तर देत म्हटलं की, पाकिस्तान भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करतो आहे. सुप्रीम कोर्टाने कायद्याच्या आधारे यावर निर्णय दिला आहे. पाकिस्तान ज्या प्रकारे चुकीचा प्रचार करतो आहे, ते निंदनीय आहे.जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्र शासित प्रदेश केल्यानंतर भारताने यावर म्हटलं की, हे दोन्ही भारताचा अंतर्गत भाग आहे. पाकिस्तानकडून या भागात घुसखोरी सुरु आहे. पाकिस्तान सतत भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना बळ देतो आहे.
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर आता दिल....
अधिक वाचा