ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

शहर : देश

LAC वर तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली. चीनने पेट्रोलिंगमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे झडप झाली. संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं की, आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. सेनेच्या शौर्याचं कौतूक केलं पाहिजे.

संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं की, १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झडपमध्ये आपले २० जवान शहीद झाले. पंतप्रधान मोदींनी लडाखला जावून जवानांचा आत्मविश्वास वाढवला. मी देखील लडाख दौरा केला. चीन औपचारिक सीमा मानत नाही. त्यांच्या सांगण्यात आणि करण्यात फरक असतो. लागोपाठ उकवण्याचं काम करत आहे. चीनने एलएसीवर असलेली स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.'

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटलं की, 'दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गाने वाद मिटवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. 1998 नंतर द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत. पण चीन आणि भारतचा सीमावाद अजूनही सूटलेला नाही.' 'सभागृहाला हे ठाऊक आहे की गेल्या कित्येक दशकांत चीनने मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं आहे. ज्यामुळे सीमाभागात त्यांची उपस्थिती क्षमता वाढली आहे. त्यास उत्तर म्हणून आमच्या सरकारनेही सीमा भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात वाढ केली आहे, जी आधीपासूनच जवळपास दुप्पट झाली आहे. यामुळे सीमाभागात आमचे जवान अधिक सतर्क राहू शकतात आणि गरज पडल्यास कारवाई देखील करु शकतात. आगामी काळात या उद्देशासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध राहील.'

संरक्षणमंत्री म्हणाले की, 'देशाच्या हितासाठी कितीही मोठे कठीण पाऊलं उचलावे लागले असले तरी आम्ही मागे हटणार नाही. यापूर्वीही चीनबरोबर सीमावर्ती भागात दीर्घकाळ तणाव निर्माण झाला होता. मला देशातील नागरिकांना हे सांगायचे आहे की आपल्या सैनिकांचा उत्साह आणि धैर्य बुलंद आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यास आमचे सैनिक कटिबद्ध आहेत. यावेळीसुद्धा आमच्या सीमेवरील वीरांनी कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवण्याऐवजी संयम धैर्य याचा परिचय दिला.'

मागे

उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक....

अधिक वाचा

पुढे  

दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतणार राम-लक्ष्मण- सीतेच्या चोरीला गेलेल्या मूर्ती
दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतणार राम-लक्ष्मण- सीतेच्या चोरीला गेलेल्या मूर्ती

तामिळनाडू येथील विष्णुमंदिरातून १९७८ मध्ये चोरीला गेलेल्या विजयनगर कालखं....

Read more