ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताची ही पॅरा-मिलिटरी फोर्स, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केली, जगाला धडकी भरवते...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताची ही पॅरा-मिलिटरी फोर्स, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केली, जगाला धडकी भरवते...

शहर : मुंबई

भारतीय लष्कराच्या पैराट्रूपर्सला जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्सेस असल्याचे सांगितले जाते. ही फोर्स इतकी विशेष आहे की, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या फोर्सला जॉईन होण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाही. लेफ्टनंट कर्नल म्हणून टेरिटोरियल आर्मीशी संबंधित असलेला महेंद्रसिंग धोनी याच पॅरा फोर्सशी जोडलेला आहे. ही तिच स्पेशल फोर्स आहे, जिने 2016 ला उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केली. या फोर्सबद्दल सर्व काही जाणून घ्या.

फोर्सचं दुसऱ्या महायुद्धाशी कनेक्शन

पॅरा स्पेशल फोर्सेस पॅराशूट रेजिमेंटशी संबंधित आहेत. या युनिटचा संबंध दुसर्‍या महायुद्धाशी आहे. ऑक्टोबर 1941ला 50 पॅराशूट ब्रिगेडची स्थापना झाली. 9 पॅराला 1966 मध्ये तयार केले गेले आणि त्यामुळे याला 9 व्या पॅराशूट कमांडो बटालियन म्हणून ओळखले जाते. ही सैन्यातील सर्वात जुनी पॅरा युनिट आहे. सध्या सैन्यात पॅरा फोर्सच्या 9 बटालियन आहेत.

1 पॅरा (एसएफ)

2 पॅरा (एसएफ)

3 पॅरा (एसएफ)

4 पैरा (एसएफ)

9 पॅरा(एसएफ)

10 पॅरा (एसएफ)

11 पॅरा (एसएफ)

12 पॅरा (एसएफ)

21 पॅरा (एसएफ)

30,000 फुटांवरून मारावी लागते उडी

जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 साली लढाई झाली, तेव्हा उत्तर भारतातील इन्फंट्री युनिट्सचे सैनिक गार्ड्स ब्रिगेडच्या मेजर मेघ सिंग यांच्या नेतृत्वात पाठवले गेले. या गटाची कामगिरी पाहता, त्याची स्वतंत्रपणे स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर, एक विशेष बटालियन तयार केली गेली. परंतु पॅराट्रूपिंगला कमांडो रणनीतीचा अविभाज्य भाग ठेवण्यात आले. यानंतर त्याला पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रांसफर करण्यात आले.

जुलै 1996 मध्ये पॅराशूट रेजिमेंट देशातील पहिली स्पेशल ऑपरेशन युनिट बनली. 30 हजार फूट उंचीवरून उडी मारण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण पॅरा कमांडोना 15 दिवस दिली जाते.

मागे

स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर घेता येईल कोविड व्हॅक्सिन
स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर घेता येईल कोविड व्हॅक्सिन

एक चांगली बातमी.आता स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर कोविड व्हॅक्सिन घ....

अधिक वाचा

पुढे  

स्पूतनिक भारतातच १० कोटी डोसची निर्मिती करणार, पहिली क्वालिटी चेक रशियातूनच
स्पूतनिक भारतातच १० कोटी डोसची निर्मिती करणार, पहिली क्वालिटी चेक रशियातूनच

भारतात कोरोनावर उपचार म्हणून लसीकरण सुरु करण्यात आले, परंतु इतकी मोठी लोकस....

Read more